नवी दिल्ली, दिनांक, ०६ ऑगस्ट २०२५
देशभरातील 78 लाख EPS-95 पेन्शनधारकांना किमान 7500/- रुपये पेन्शन व इतर मागण्यांसाठी केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास खासदारांनी संसद भवन पायऱ्यांवर खासदारांनी जोरदार निदर्शने केली.
"We Want Justice", "EPS पेन्शनर्स की यही पुकार, जल्दी निर्णय ले सरकार", "कृपया EPS95 पेंशनर्स को बचाएं" अशा विविध घोषणा देत खासदारांनी केंद्र सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध केला. आंदोलकांनी हातात फलक घेऊन EPS-95 पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे आवाज उठवला.
EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी 4 व 5 ऑगस्ट रोजी पेन्शन वाढीच्या मागणीसाठी आंदोलन केले होते त्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही व्यक्त केला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी मागणी केली की, EPS-95 अंतर्गत लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ 1000/- रुपयापर्यंत अत्यल्प पेन्शन मिळते, जी त्यांच्या गरजांनुसार अत्यंत अपुरी आहे. परिणामी त्यांना उपेक्षा, आर्थिक अडचणी व असुक्षिततेचा सामना करावा लागत आहे. या पेन्शन धारकांनी आयुष्यभर कष्ट केले आहेत, त्यांना सन्मानाने जगता यावे, अशी त्यांची मूलभूत अपेक्षा आहे. मात्र हे सरकार त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क हिरावून घेत आहे EPS-95 पेन्शनधारकांच्या सन्मानपूर्वक निवृत्त आयुष्यासाठी सरकारने त्वरित हस्तक्षेप करून किमान 7500/- रुपये पेन्शन व वैद्यकीय आणि इतर सुविधा लागू कराव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
*तिरुपती परकीपंडला (tp)*
सोलापूर शहर काँग्रेस मिडिया सेल
माझा नवीन व्हॉट्सॲप नंबर *8010505458* आपण सेव करून आपल्या ग्रुप मध्ये अँड करावा.
0 Comments