मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्याने तालुका पंचनामे होऊन नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मा. नायब तहसीलदार मंगळवेढा श्रीमती एस एस कन्हेरे यांना यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांनी अशी मागणी केली की, सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावामध्ये शेतीपिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन, तुर व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नदीकाठावरील शेतकऱ्यांचे भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे.
यामुळे अतिवृष्टीमुळे होणारे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यात यावेत व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून सुसह्य व शाश्वत मदत देण्यात यावी.
तरी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मा. जि. प. सदस्य अर्जुन पाटील, दामाजी कारखाना संचालक राजेंद्र चरणु पाटील, प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी रविकिरण कोळेकर, सिद्धू कोकरे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, समाधान हाके, पद्मिनी शेट्टीयार, पंडित पाटील, सत्तार इनामदार, सचिन पाटील, संजय पाटील हवालदार, रणजीत पाटील, रवी पुजारी, सागर रणे, राजू हवालदार, प्रकाश चौगुले, अशोक मोरे, बिरुदेव कोकरे, काका पुजारी, मल्हारी पाराधे, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments