LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी*दि. 22 सप्टेंबर ते 07 ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव



  पंढरपूर (ता.20) प्रतिवर्षीप्रमाणे दि. 22 सप्टेंबर ते 07 ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरात आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे पालन करुन 
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील स्वच्छता, दर्शनरांग सुलभ व द्रुतगतीने चालविण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती व इतर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव कालावधीत सभामंडप येथे भजन, किर्तन, गोंधळ, पंचसुक्त पवमान अभिषेक, रूक्मिणी स्वयंवर कथा, रूक्मिणी स्वंयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळाची भजने संपन्न होणार आहेत.

       त्याचबरोबर अंबाबाई मंदिर, यमाई तुकाई मंदिर, रेणूकादेवी मंदिर, लखुबाई मंदिर, यल्लमादेवी मंदिर, पद्यमावती मंदिर इत्यादी परिवार देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी कापडी मंडप, बॅरीकेटींग, स्वच्छता , पिण्याचे पाणी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याच्या नियोजनची पाहणी देखील मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख अतुल बक्षी, बलभीम पावले, राजाराम ढगे यांनी केली आहे. 

नवरात्र कालावधीत रूक्मिणीमातेस पारंपारीक पध्दतीचे विविध पोषाख करून अलंकार परिधान करण्यात येतात. सदरचे अलंकार पुरातन व दुर्मिळ असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व अलंकार नव्याने गाठविण्यात आलेले आहेत. तसेच संत तुकाराम भवन येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य महोदय, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी केली आहे. नवरात्र उत्सव पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सर्व खातेप्रमुख व अधिनस्त कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments