LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वृक्षलागवड मोहीम संपन्न



 
पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली.
         संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या वृक्षलागवड मोहिमेत महाविद्यालयाच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या क्षेत्रात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये  आंबा, चिंच, बोर, वड, लिंब, अशाप्रकारची एकूण १५५ झाडे लावण्यात आली. या मोहिमेची सुरवात प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजकुमार कदम यांच्या हस्ते एक झाड लावून करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अमोल चौंडे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. वृक्षलागवडीमुळे महाविद्यालय परिसर हिरवागार होऊन पर्यावरण संतुलन व संवर्धनाला हातभार लागणार आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील स्वेरी हिरीरीने सहभागी होऊन समाजोपयोगी कार्य नेहमीच करत असते. यामुळे सर्वत्र स्वेरीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments