सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी व गावडेवाडी या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक पातळीवरील विविध समस्या जाणून घेतल्या. लोकप्रतिनिधी या नात्याने येत्या काळात या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला मिळत नसलेला भाव या संकटांनी शेतकरी अक्षरशः चिरडला आहे. महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफीची गाजावाजा करणारी आश्वासने दिली होती; मात्र आज ती आश्वासने खोटी ठरली आहेत. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार भ्रष्टाचार आणि सत्तासंघर्षात मश्गुल आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचा निर्धारही खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी मनगोळी, गावडेवाडी सरपंच संजय गायकवाड, माजी सरपंच तानाजी येलगुंडे, गोरख चव्हाण , गणेश मोरे, अमोल खांडेकर, योगेश पवार, सचिन खांडेकर, दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनंत म्हेत्रे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, यांच्यासह ग्रामस्थ.मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments