सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतपिकांसह शेतीवरील माती, घरे, जनावरे, गोठे, मोटार, पाईपलाईन आणि शेतसाहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन संकटात सापडले आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतातील उभे पीक वाहून गेले असून माती खरवडून गेली आहे. घरातील धान्य, भांडी व इतर वस्तू चिखलात बुडाल्या आहेत. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना व कुटुंबांना खासदार शिंदे यांनी भेटून धीर दिला.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील पीर टाकळी, शिवनी, तिऱ्हे, विरवडे, कामती, आष्टे, कोळेगांव (आष्टे), तसेच अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (ज), हाळहल्ली (मैं), उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, शिवणी, तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी, वडकबाळ, मनगोळी या गावात गरजूंना जेवणाची व्यवस्था, चादरी, टँकर व काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.
या पुराच्या दृश्यांनी मन हेलावून टाकले असून अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच गोठे, चारा व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांचे त्यांच्या पशुधनावर जीवापेक्षाही जास्त प्रेम असल्याने त्यांना ही हानी अधिक वेदनादायक ठरली आहे. "जितक्या वेगाने माणसांना वाचवण्यासाठी धडपड केली जाते, तशीच मुक्या जनावरांसाठीही सोय झाली पाहिजे, म्हणून खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील विरवडे, कोळेगाव, शिंगोली, तरटगाव व शिरपूर या गावात सुग्रास, मुरगास व पशुखाद्याचे वाटप करण्यात आले.
"या आपत्तीच्या काळात माझा शेतकरी आणि ग्रामस्थ एकटे नाहीत; त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे," असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
या मदत कार्यात मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, दक्षिण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत म्हेत्रे, अविनाश टेळे सुभाष पाटील शिवमुर्ती पाटील अनिकेत पाटील सुनील पवार सचिन आवताडे सुनील खडके पप्पू भांगे, युवक अध्यक्ष निशांत कवडे, हर्षदीप गायकवाड, शिवशरण करजगी, गजानंद जकीकोरे, श्रीशैल पाटील, भोजराज कलमणी, शिवशंकर कलमणी, आदी सहकार्य करत आहेत.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments