LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*मेहनत आणि शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली ..*


     *कोणत्याही क्षेत्रात स्वतःलाच मेहनत करून यशाची शिखरे गाठावी लागतात. यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने चांगला अभ्यास करून यश मिळवणे गरजेचे आहे .कारण मेहनत आणि शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे सर यांनी केले. न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट(पॉलीटेक्निक )कोर्टी, पंढरपूर येथे गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.*
       *पुढे बोलताना प्राचार्य लोंढे सर म्हणाले ,शिक्षकांच्या चांगल्या मार्गदर्शनातूनच चांगला विद्यार्थी घडत असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षकांच्या चांगल्या मार्गदर्शनाचा व दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा चांगला उपयोग करून घेऊन स्वतःचे ध्येय साध्य करावे .उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच आपण आपले यशाचे शिखर गाठत असतो. यशाचे शिखर गाठण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटाला मोठ्या धैर्याने आपण सामोरे गेले पाहिजे असे आवाहनही प्राचार्य लोंढे सर यांनी केले. विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 90% च्या पुढे  मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गौरी धनवडे व पिंकी घांची यांना प्रत्येकी 8000 रुपये बक्षीस देण्यात आले.85% च्या पुढे मार्क्स  मिळविल्यांमध्ये पिंकी घांची, समीक्षा चव्हाण, हर्षदा रवळू, कोमल चौगुले, सालिया पठाण, सायली बिडकर, सानिका सकटे, स्नेहा पवार, आरती पाटोळे, पल्लवी काळेल, आस्था ढेरे, वैष्णवी कलागते, स्वप्निल ढगे, गौरी गडदे, वैष्णवी भाकरे, वनिता शिंदे, प्रशांत अंबुले, शुभम सागर, ओंकार पवार, जय साळुंखे, नम्रता चवरे, सानिका चौधरी, सारंग चुंबळकर, ऐश्वर्या शिंदे, सानिया मुलाणी, अल्ताब मुलाणी, शुभांगी जाधव, पायल घोडके, अनुज पवार, अंकिता राजगुडे, सादिया शेख, दिपाली बागल, पृथ्वीराज जाधव यांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी 3000 रु बक्षीस देण्यात आले. न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजच्या या स्तुत्य उपक्रमाचे विद्यार्थ्यांबरोबरच विशेषत: पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पालक प्रतिनिधी अमित साळुंखे यांनीही आपले विचार व्यक्त केले. अमित साळुंखे बोलताना म्हणाले ,प्रत्येक विद्यार्थ्यांचे आई-वडील काहीतरी उद्देश, हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवत असतो . विद्यार्थ्यांनीही अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवून आपले ध्येय पूर्ण केले पाहिजे व आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजमध्ये चांगला विद्यार्थी घडविण्याबरोबरच चांगला माणूस घडविण्याचेही काम केले जाते याचा आम्हा सर्व पालकांना सार्थ अभिमान आहे असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.राजाराम (नाना)निकम साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.*
        *यावेळी प्राचार्य विक्रम लोंढे सर ,संस्था प्रतिनिधी मा.श्री. ज्ञानेश्वर शेडगे साहेब, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व विशेषता पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन स्वप्निल चव्हाण सर यांनी केले तर प्रथम वर्ष विभाग प्रमुख बाळासाहेब ननवरे सर यांनी आभार मानले.*

Post a Comment

0 Comments