पंढरपुर (प्रतिनिधी)
आदर्श प्राथमिक बाल मंदिर शाळेत “बाजार डे” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडला. शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी सजावट, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि खेळण्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी ढोकळा, भेळ, शेवपुरी, गोडधोड पदार्थ, सरबत आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले. काही विद्यार्थ्यांनी हस्तकला वस्तू, पुस्तकांची बुकमार्क्स, सजावटीच्या वस्तू आणि छोट्या खेळण्यांची विक्री केली. पालक, शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्व काम स्वतःच्या प्रयत्नाने केले. स्टॉल्स सजवणे, वस्तूंची विक्री करणे, ग्राहकांशी संवाद साधणे, पैशांची देवाणघेवाण व्यवस्थित पार पाडणे अशा सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी शिकल्या. यामुळे त्यांना उद्योजकतेचा, स्वावलंबनाचा आणि व्यवस्थापनाचा महत्त्वाचा अनुभव मिळाला.
शाळेचे मुख्याध्यापिका आपल्या भाषणात म्हणाले की, “विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण नको तर व्यवहार्य जीवनात आवश्यक असलेल्या गोष्टीही शिकायला हव्यात. या बाजार डे सारख्या उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, गणिती कौशल्य तर सुधारतेच पण संवाद कौशल्य, व्यवहारज्ञान आणि सहकार्याची भावना देखील विकसित होते.”
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये उद्योगशील वृत्ती निर्माण होते आणि मुलांना प्रत्यक्ष व्यवहारात शिकण्याची संधी मिळते.
यासाठी सर्व शिक्षिका सौ .रजनीदेशपांडे मॅडम, शिंदे मॅडम, जाधव मॅडम, कोकणी मॅडम, प्रणोती कुलकर्णी मॅडम, सौ चासकर मॅडम, भक्ती उत्पात मॅडम या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

0 Comments