न्यु सातारा मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मध्ये नवरात्री निमित्त महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे स्मार्ट ट्रेनर कृष्णन अय्यर हे लाभले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व, उद्योजकतेच्या संधी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेतील करिअर पर्याय याबाबत सविस्तर माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
त्याचप्रमाणे बँकिंग, स्टार्ट-अप्स, घरगुती उद्योग आणि सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतही अय्यर यांच्याकडून सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले, “आजच्या युगात स्त्रीने केवळ शिक्षणातच नव्हे तर आर्थिक निर्णयक्षमतामध्येही पुढे असणे गरजेचे आहे. स्वावलंबनामुळे व्यक्तिमत्त्व अधिक बळकट होते.”
यावेळी स्वयं-सहायता गट, मायक्रो फायनान्स आणि ऑनलाइन व्यवसाय या संकल्पनांवर विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त चर्चाही केली.
विद्यार्थिनींनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, “या मार्गदर्शनामुळे आमच्या करिअर आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत नवे विचार सुचले.” महाविद्यालय प्रशासनाने अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याचा निर्णय ही यावेळी घेतला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजाराम निकम साहेब यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित बंडगर सर यांनी केले.

0 Comments