LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *अतिवृष्टीच्या अस्मानी संकटात – खासदार प्रणिती शिंदे यांचा मदतीचा हात*



सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर स्वरूप धारण करत असून तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रणिती शिंदे या स्वतः मतदारसंघातील विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.

पूरग्रस्तांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांच्या माध्यमातून अन्नधान्य, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, चादर, कपडे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे.

या कठीण काळात संकटग्रस्त नागरिकांच्या वेदना कमी करण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे सातत्याने प्रयत्नशील असून पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत असे सांगितले.

#Praniti shinde 
#प्रणिती शिंदे
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments