LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श प्राथमिक विद्यालयात उत्साहात पार पडली बालसभा!



पंढरपुर(प्रतिनिधी)
आदर्श प्राथमिक विद्यालया पंढरपुर येथे तिसरीच्या वर्गाची बालसभा आयोजीत करण्यात आली.महात्मा गांधीजी व लालबहादुर शास्रीजी यांच्या जयंती निमीत्त बालसभा आयोजीत करण्यात आला.या बालसभेसाठी प्रमुख पाहुणे श्री विष्णु चव्हाण विस्तारअधिकारी व केंद्रसमन्वयक श्री रामचंद्र बोडरे सर तसेच संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या रेखाताई भालेराव व सदस्य श्री प्रशांतजी कुलकर्णी सर उपस्थित होते.
या बालसभेचे वैशिष्टय म्हणजे संपुर्ण बालसभेचे कामकाज विद्यार्थीनीच पाहीले. या सभेत इयत्ता तिसरीच्या च्या विद्यार्थीनी महात्मा गांधीजीचा जीवनपट आपल्या उत्क्रुष्ट भाषणातुन उलगडला.पाहुण्यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थीचे व शाळेत राबवल्या जाणार्या उपक्रमाचे कौतुक केले.संस्थेच्या सदस्यांनी विद्यार्थीचे भरभरुन कौतुक केले.यानंतर पाहुण्यांच्या हस्ते भाषणात सहभागी झालेल्या विद्यार्थीना बक्षीसे देण्यात आली.सभेच्या समोरोपप्रसंगी साधु म्हणजे या मनुजाला हे भजन घेण्यात आले.या प्रसंगी शिशुविहाराच्या मुख्याधिपिका देशमुख व आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याधिपिका सौ.घंटीबाई या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी संस्थचे अध्यक्ष सतीश पुरंदरा.माजी अध्यक्षा वीणाताई जोशी सदस्या रेखाताइ ऊंबरकर ,सदस्य डाॅ अनिल जोशी, 
ऍडव्होकेट ज्ञानेश आराध्ये,सदस्य  प्रशांजी पारिचारक, सदस्य डाॅ  तेजस भोपोटकर यांनी कार्यक्रमांसाठी शुभेच्या दिल्या.

Post a Comment

0 Comments