पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पदव्युत्तर पदवी असलेल्या एमसीए च्या प्रवेशाकरिता प्रवेश पूर्व परीक्षा देणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘एमएएच-एमसीए-सीईटी- २०२६’ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया बुधवार, दि.०७ जानेवारी २०२६ पासून ते मंगळवार, दि.१० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमसीए-सीईटी २०२६ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमसीए विभागात उपलब्ध करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
पदव्युत्तर पदवी असलेल्या एमसीए च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी ‘एमएएच-एमसीए-सीईटी २०२६’ ही परीक्षा साधारण मार्च २०२६ दरम्यान होणार आहे. एमसीएच्या या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया बुधवार, दि.०७ जानेवारी २०२६ पासून ते मंगळवार, दि.१० फेब्रुवारी २०२६ (रात्री.११.५९) पर्यंत पर्यंत चालणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५) व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख (मोबा.नं.९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments