LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

'बीडा' आणि 'स्वेरी' यांच्यात सामंजस्य करारप्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना होणार या कराराचा फायदा



पंढरपूर- बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (बीडा), बारामती आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील 'स्वेरी' अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आला असून या करारामुळे विद्यार्थ्यांमध्ये व प्राध्यापकांमध्ये उद्योजकता, उद्योग-संपर्क व प्रात्यक्षिक शिक्षण यांना विशेष चालना मिळणार आहे.
       स्वेरी मध्ये आयोजिलेल्या या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमास बारामती एमआयडीसी मधील ७०० हून अधिक उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'बीडा' या औद्योगिक संघटनेचे विविध अधिकारी उपस्थित होते. यामध्ये बीडा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, कार्यकारी समिती सदस्य महादेव गायकवाड, संभाजीराव माने आणि इन्फोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अमोल रनसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. हे सर्व प्रथम पिढीतील यशस्वी उद्योजक असून, त्यांनी विद्यार्थ्यांशी आपले प्रेरणादायी अनुभव शेअर करत आजच्या स्पर्धात्मक वातावरणात उद्योजकतेचे महत्त्व व गरज अधोरेखित केली. यावेळी बीडा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. यामध्ये बारामती एमआयडीसी मधील उद्योगांना भेटी, इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स, प्राध्यापकांसाठी उद्योग-संपर्क तसेच स्वेरीमध्ये उद्योगधंद्यात यशस्वी ठरलेल्या उद्योग तज्ज्ञांची प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश आहे. यावेळी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी ‘कष्ट, शिस्त आणि उद्योगतज्ज्ञांकडून शिकण्याचे महत्त्व’ यावर प्रकाश टाकत, यशस्वी उद्योजकतेसाठी हे मूलभूत घटक असल्याचे स्पष्ट केले. तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांनी दृढ इच्छाशक्ती व प्रात्यक्षिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करत व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी ते आवश्यक असल्याचे अनुभवातून सांगितले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून स्वेरीमधील विद्यार्थी उद्योगासाठी परिपक्व बनविण्यासाठी पदवीधर घडविणे, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे आणि प्रभावी उद्योग-सहकार्य वाढविणे यामध्ये मोलाचा ठरणार आहे. या सामंजस्य करारावर स्वेरीच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांचे तर बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (बीडा) च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी स्वाक्षरी केली आहे. हा सामंजस्य करार झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थ्यांनी असोसिएशन व स्वेरीचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments