LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन*



सोलापूर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (मोहनदास करमचंद गांधी) हे सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. सत्य व अहिंसेच्या तत्त्वांवर आधारित त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारला. देशातील जनतेला देशप्रेमाच्या धाग्यात गुंफून त्यांनी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधींच्या विचारांनी केवळ भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक नागरी हक्क चळवळींनाही प्रेरणा दिली आहे.
आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, नगरसेवक नरसिंह आसादे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, व्यापार व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, उपेंद्र टाकर, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, बसवराज म्हेत्रे, राजन कामात, परशुराम सतारेवाले, शिवशंकर अंजनाळकर, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, रफिक चकुले, नूरअहमद नालवार, काळीदास काळपगार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, ज्योती गायकवाड, रमाकांत साळुंखे, सचिन पवार, चंद्रकांत टिक्के, शिवाजी साळुंखे, मोहसीन फुलारी, दत्तात्रय गजभार, अभिलाष अच्युगटला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments