LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आंतर पदविका कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना विजेते पद प्राप्त.

आंतर पदविका कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना  विजेते पद प्राप्त.

न्यु सातारा समुह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी मधील विद्यार्थ्यांनी  आंतर पदविका क्रीडा स्पर्धा 2025-26  (IEDSSA)अंतर्गत  घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवित घवघवीत यश प्राप्त केले.  याच पार्श्वभूमीवर न्यु सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयाकडून त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्याकडून  विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोबतच त्यांच्यामधील क्रीडा व कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे सांगण्यात आले व स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . त्याचप्रमाणे स्पोर्ट कमिटीचे ही अभिनंदन याप्रसंगी करण्यात आले.
स्पोर्ट कमिटी हेड श्री. विश्वनाथ कुंभार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या संघातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट कमिटी प्रशिक्षक श्री. गणेश पडवळकर  यांच्याकडून नियमित सराव करून घेण्यात आला व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विजेतेपद मिळताच क्षणी सर्व  शिक्षकांकडून व विद्यार्थ्यां कडूनही पडवळकर सर यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करण्यात आले.
कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांच्याकडुन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 यावेळी कॉलेजचे संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड , सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments