LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

साप्ताहिक ‘अनंत विचार’चे संपादक नागेश आदापुरे यांना “राज्यस्तरीय नवचेतना – उत्कृष्ट संघटक 2025-26” पुरस्कार


 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र वाशिम जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या २७व्या राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी वाशिम येथील वाटाणे लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला.

या अधिवेशनात साप्ताहिक ‘अनंत विचार’ चे संपादक नागेश आदापुरे यांना “राज्यस्तरीय नवचेतना – उत्कृष्ट संघटक 2025-26” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भारत देशाचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व संघटन कौशल्याचा गौरव म्हणून हा सन्मान देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, अधिवेशनाचे प्रमुख आयोजक निलेश सोमाणी, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, दैनिक गांवकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर तसेच स्थानिक राजकीय व सामाजिक पदाधिकारी, उद्योजक, संत-महंत, वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, संपादक, पत्रकार, महिला पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर भोजन व्यवस्था व सर्व पत्रकार बांधवांना  भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला .

शेवटी सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी संघाची भूमिका, निर्णय व भविष्यातील उपक्रम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले व अधिवेशन संपन्न झाले 
 साप्ताहिक अनंत विचार संपादक नागेश आदापुरे यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

Post a Comment

0 Comments