सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून मोहोळ तालुक्यातील कुरूल गावात रस्ता विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२४–२५ मधील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अनुदान योजना याअंतर्गत या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या मंजूर निधीतून कुरूल ते जुना कातेवाडी (जाधव–चव्हाण वस्ती) दरम्यान खडीकरण व डांबरीकरण रस्ता तयार करण्यात येणार आहे.
सदर कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मान्यवर नेतेमंडळी गावातील प्रतिष्ठित यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
नव्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठा दिलासा मिळणार असून शेतीमाल वाहतूक, दैनंदिन प्रवास तसेच आपत्कालीन सेवांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, प. स. सदस्य धनाजी माळी, युवा नेते लक्ष्मण भालेराव, संभाजी नाना पाटील, पप्पू पाटील, राहुल पाटील, राजेंद्र लांडे, विलास काका पाटील, ज्ञानेश्वर कदम, राहुल धोत्रे, अभिषेक आंबरे, शैलेश आंबरे, ग्रामस्थ व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments