न्यू सातारा समूह मुंबई संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक येथे न्यू सातारा समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाराम (नाना) महादेव निकम यांच्या संकल्पनेतुन व कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस व प्रतिभा शक्तीस चालना मिळण्यासाठी टेक्नो स्पेक्ट्रम 2026 या टेक्निकल इव्हेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश डी. सपकाळ सर विभागप्रमुख मेकॅनिकल विभाग, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे साहेब, कॉलेज प्राचार्य विक्रम लोंढे सर,ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विशाल बाड सर, सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर प्रेझेंटेशन, कॅड वाॅर, क्विज कॉम्पिटिशन, पीपीटी मेकिंग अँड प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन, गेमिंग कॉम्पिटिशन, कोडींग कॉम्पिटिशन याचा समावेश होता प्रोजेक्ट कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये बारस्कर साक्षी, खटके सानिका, देठे तपस्वी, कांबळे दिक्षा या विजेत्या ठरल्या, तर गायकवाड मंगेश, काळे चैतन्य व कन्हेरकर संस्कृती, सकटे गायत्री, कांबळे अनुष्का, भंडारी वैष्णवी हे उपविजेत्या ठरल्या.पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन यामध्ये जाधव अंकिता या विजेत्या ठरल्या तर शिवम साळुंखे हे उपविजेते ठरले. कॅड वाॅर या स्पर्धेमध्ये विजय दीपक चव्हाण याने प्रथम क्रमांक मिळवला तर ओंकार कंगले, संस्कार राऊत या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. क्विज कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये पवार पायल विजय ही विजेती ठरली तर ओम अण्णा माने हा उपविजेता ठरला. पीपीटी मेकिंग अँड प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये यशराज देशमुख व शुभम वाघमारे हे विजेते ठरले तर श्रुती डुने ही उपविजेती ठरली. गेमिंग कॉम्पिटिशन या प्रकारांमध्ये सोहम नवले, मोहिते सुरवसे, साई, फलटणकर, आदित्य शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर आकाश दगडे, अथर्व दगडे, श्रेयश सुळ, शुभम गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कोडींग कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये साक्षी संजय गंगथडे या विजेत्या ठरल्या तर मानसी गोळे या उपविजेत्या ठरल्या. सदर कार्यक्रमामध्ये 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमा वेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य विक्रम लोंढे सर, प्रा. विशाल बाड सर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा विक्रम माळी सर, सर्व विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब ननवरे सर, प्रा. नवनाथ हेगडे सर, प्रा. विश्वनाथ कुंभार सर, प्रा. सचिन पुरी सर, प्रा. गणेश चौगुले सर, प्रा. सौ. रोहिनी पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते पारितोषकांचे वितरण करण्यात आले. प्रोजेक्ट कॉम्पिटिशन साठी विजेत्या विद्यार्थ्यांना रुपये 3000 व प्रमाणपत्र तर उपविजेत्या विद्यार्थ्यांना रुपये 1500 व प्रमाणपत्र इतर सर्व इव्हेंट साठी विजेत्या विद्यार्थ्यांना रुपये 2000 व प्रमाणपत्र तर उपविजेत्या विद्यार्थ्यांना रुपये 1000 व प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व उपस्थितांचे आभार कार्यक्रम समन्वयक प्रा. विक्रम माळी सर यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कु. सपना धोडमिसे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments