LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने, भारत–अमेरिका व्यापार कराराची होळी; शेतकरी, व्यापारी व ग्रामीण अर्थव्यवस्थेस घातक – चेतनभाऊ नरोटे*


सोलापूर : दिनांक, ०२ मार्च २०२६

अमेरिकेतील अश्लील एपस्टाईन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी तसेच भाजप समर्थकांची नावे समोर आल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली देशहिताशी तडजोड करणारा भारत–अमेरिका व्यापार करार केला. या कराराच्या निषेधार्थ सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली भारत–अमेरिका व्यापार कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

होळी पेटविल्यानंतर देशाशी गद्दारी करून भारत अमेरिका व्यापार करणाऱ्या मोदी सरकारच्या नावाने बोंब मारण्यात आली. तसेच
नरेंदर झाले सरेंडर, P. M. Is Compromised अश्या जोरजोरात घोषणा देण्यात आल्या.

👉 होळी हा अनिष्ट व असत्य प्रवृत्तींच्या दहनाचे प्रतीक असलेला सण असून, याच पवित्र अग्नीत आज देशहिताला मारक ठरलेल्या भारत–अमेरिका व्यापार कराराची होळी करण्यात येत असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना नरोटे म्हणाले की, अमेरिकेतील अश्लील एपस्टाईन प्रकरणातून स्वतःची छबी वाचविण्यासाठी आणि अमेरिकेच्या दबावाखाली भारत सरकारने भारत–अमेरिका व्यापार करार केला. हा करार देशाच्या हिताचा नसून, तो शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी अत्यंत घातक आहे.

चेतनभाऊ नरोटे यांनी करारातील टॅरिफ रचनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या करारानुसार अमेरिका भारताकडून आयात होणाऱ्या मालावर १८ टक्के टॅरिफ आकारत आहे, तर अमेरिका भारतात निर्यात करणाऱ्या मालावर ० टक्के व अत्यंत कमी टॅरिफ ठेवण्यात आला आहे. ही अट पूर्णतः एकतर्फी असून भारताच्या आर्थिक हिताला मारक आहे.

२०१४ पूर्वी अमेरिका भारतातून आयात होणाऱ्या मालावर केवळ ३ टक्के टॅरिफ आकारत होती. मात्र नरेंद्र मोदी यांच्या काळात हा टॅरिफ प्रथम २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर रशियन क्रूड तेल आयातीच्या कारणावरून भारतावर आणखी २५ टक्के दंडात्मक टॅरिफ लादण्यात आला. म्हणजेच एकूण ५० टक्के टॅरिफचा बोजा भारतावर टाकण्यात आला.
आता अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांनी त्यातील पहिल्या २५ टक्के टॅरिफमध्ये केवळ ७ टक्क्यांची सवलत देऊन तो १८ टक्क्यांवर आणला आहे. हे कोणत्याही दृष्टीने भारतासाठी दिलासा नाही. कारण १८ टक्के टॅरिफ हा आधीच्या ३ टक्के टॅरिफपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, हे एखादा सामान्य माणूसही सांगू शकतो, असे नरोटे म्हणाले.
या तथाकथित सवलतीमागेही उघड धमकी असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताने रशियन क्रूड तेलाची खरेदी सुरूच ठेवल्यास पुन्हा २५ टक्के दंडात्मक टॅरिफ लावण्याचे अधिकार ट्रम्प यांनी आपल्या व्यापार मंत्र्यांना दिले आहेत.

भारत–अमेरिका यांच्यातील या शरणागतीरूपी करारावर स्वाक्षरीची शाई अजून वाळलेली नसतानाच त्याचे घातक परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांत सोयाबीन, मका, कापूस आणि तूर यांचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. हा करार केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर व्यापारी वर्ग, वस्त्रोद्योग आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही मृत्यूघंटा ठरणार आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आयातीमुळे देशांतर्गत उद्योग बंद पडून रोजगारही हिरावला जाणार आहे.

चेतनभाऊ नरोटे पुढे म्हणाले की, अमेरिकेतील अश्लील एपस्टाईन प्रकरण स्वतःच्या गळ्यापर्यंत येऊ नये म्हणून जर मोदी सरकार भारतीय शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावत असेल, तर सत्तेला जाब विचारणे हे लोकशाहीतील कर्तव्य आहे. “देश विकला गेला आहे,” हा Rahul Gandhi यांचा आरोप आज बाजारातील घडामोडींमधून खरा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील कृषी उत्पादनांसाठी तसेच इतर वस्तूंसाठी भारतीय बाजार खुला करणे म्हणजे देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गळचेपी करण्यासारखे आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेची भाषा करणारे सरकार आज परदेशी उत्पादनांसमोर भारतीय शेतकरी आणि उद्योगांना उघडे पाडत आहे. अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल, अन्नधान्य व इतर वस्तू भारतात आल्यास नफेखोरीला चालना मिळेल, नवीन दलाल तयार होतील आणि अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

याशिवाय एपस्टाईन फाईल्समधील प्रमुख आरोपी जेफ्री एपस्टाईन याचा जवळचा मित्र रॉबर्ट मिलार्ड याच्याकडून मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कन्या हिमानी पुरी यांच्या कंपनीला सुमारे ५७०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा आरोपही नरोटे यांनी यावेळी केला.

या करारातून नेमके कोणते देशहित साधले गेले, की हा देशातील जनतेशी केलेला उघड देशद्रोह आहे, हाच आज देशासमोरचा कळीचा प्रश्न असल्याचे चेतनभाऊ नरोटे ठामपणे सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव श्रीशैल रणदिरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, भटक्या-विमुक्त सेल अध्यक्ष युवराज जाधव, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक हरुण शेख, एन. के. क्षिरसागर, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी,
दिनेश म्हेत्रे, लखन गायकवाड, संजय गायकवाड, नूर अहमद नालवार, भीमराव शिंदे, एजाज बागवान, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, ज्योती गायकवाड, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, काळीदास काळपगार, रजाक खादरी, शिवाजी साळुंखे, चंद्रकांत टिक्के, तौसीब शेख, व्यंकटेश बोमेन, अभिलाष अच्युगटला, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments