LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नियमबाह्य सायलेन्सर मोडिफाय करून बसवू नयेतसहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांचे आवाहन * बुलेट सायलेन्सरच्या आवाजात बदल करणाऱ्यांवर होणार कारवाई



        पंढरपूर दि(02)-  पंढरपुरात बुलेट दुचाकीधारकांकडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी, विशेषतः बुलेट वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. मोठ्या कर्कश आवाजाचे, नियमबाह्य सायलेन्सर मोडिफाय करून बसवू नयेत, असे आवाहन सहा. पोलिस  अधिक्षक प्रशांत डगळे  यांनी केले आहे.
           बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे. शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सर मध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक  शाखेकडून विशेष  मोहिम  राबविण्यात येत असून. नागरिकांनी दुचाकी वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ध्वनी प्रदुषण नियम व पर्यावरण संरक्षण  अधिनियम या अतंर्गत संबधितावर  कारवाई करण्यात येईल असे आवाहनही आवाहन सहा. पोलिस  अधिक्षक प्रशांत डगळे  यांनी केले आहे.
0000000000

Post a Comment

0 Comments