पंढरपूरः ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी. फार्मसीचे १७ आणि डी.फार्मसीचे १२ अशा तब्बल २९ विद्यार्थ्यांची गुजरात येथील आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या ‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनीत कॅम्पस इंटरव्यूव्हद्वारे निवड करण्यात आली आहे.' अशी माहिती बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.
‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे मॅनेजर आणि त्यांच्या निवड समितीने स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतलेल्या इंटरव्यूव्हमधून डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या एकूण २९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. गुणात्मक अभ्यासाबरोबरच शिस्त, आदरयुक्त संस्कृती व उत्कृष्ठ शिक्षणपध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावीत झाली. निवड समितीच्या अंतिम प्रकियेतून फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे वैष्णवी मनोज देवरडे, काजल रणजित भोसले, आदित्य राजेंद्र बोडके, प्रियांका सुभाष मोकळे, प्रचिती वसंत काटकर, आरती बजरंग मेटकरी, सुमेध औदुंबर वाघमारे, सोमनाथ आबा गावंधरे, संदीप दत्तात्रय काळे, मयूर बाबासाहेब फंड, समीर चंद्रकांत शिंदे, रोहित काळाप्पा माळी, आदित्य नामदेव खुळे, आदर्श अंकुश चव्हाण, रुजुल शरद भोसले, हरी संजय खोत व अंकिता बापू लेंगरे आणि डी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे गणेश अनिल ढोणे, विनोद हणमंत बंडगर, आर्यन ज्ञानेश्वर शेळके, महेश राजेंद्र नाईकनवरे, श्रीकांत दुंडप्पा नरुटे, सतीश सिद्धराम कोळी, आदित्य बाबासाहेब भंडारे, निखिल नंदकुमार पवार, प्रमोद चंद्रकांत काळे, आदेश हणमंत पारसे, समाधान सुरेश नरळे व अमेय दिनेश जाधव या २९ विद्यार्थ्यांची ‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या कंपनीत ‘क्वालिटी कंट्रोल आणि प्रॉडक्शन’ या विभागामध्ये निवड करण्यात आली आहे. १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी इतर शहराकडे धाव घेत होते आणि शिक्षणाची गरज ओळखून ग्रामीण भागातील नागरिकांचा पैसा आणि वेळेची बचत होवून अपेक्षित उच्चशिक्षण मिळावे या हेतूने स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीनुसार २००६ साली फार्मसीची स्थापना केली. अभियांत्रिकीच्या पाऊलांवर पाऊल ठेवून फार्मसीची देखील यशस्वी वाटचाल सुरु आहे. प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये उत्कृष्ठ निकाल, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे हे दिसून येत आहे. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी सांगितले की, ‘विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्याचा उद्देश, त्यांना उत्तम करिअर संधी उपलब्ध करून देणे आहे. त्याचबरोबर स्वेरीतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात आणखी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन सातत्याने केले जाईल.’ निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मणियार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. कोमल परचंडे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. निवड झालेल्या २९ विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, पालक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी अभिनंदन केले.

0 Comments