पंढरपूर/प्रतिनिधी
मुस्लिम धर्मियांचा पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान ईद निमित्त पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून मुस्लिम समाज बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका माधुरीताई धोत्रे, संभाजी ब्रिगेडचे नेते किरणराज घाडगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक देवमारे, विठ्ठल बंदपट्टे,शफिक शेख, लालासाहेब शेख, मजीद बागवान, जमीर सय्यद, गणेश पिंपळनेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बंधू-भगिनी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की सर्वधर्मसमभाव हे दृष्टिकोन आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे कर्तव्य पार पाडत आहे. पुढील काळात नागरिकांचे प्रश्न सोडवून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून रोल मॉडेल करणार असल्याचा विश्वास धोत्रे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी धोत्रे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गेली अनेक दिवसांपासून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्व धर्मीयांचे सण,उत्सव, महापुरुषांच्या जयंती निमित्त सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी थेट शासन दरबारी प्रयत्न करत विकास निधी खेचून आणण्याचे काम धोत्रे यांच्या माध्यमातून होत असल्याने लवकरच प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून एक रोल मॉडेल म्हणून प्रभागाची ओळख निर्माण होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

0 Comments