LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिन विशेष


      8 मार्च , जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनी आणि मातावर्गाला शुभेच्छा! महिला सशक्तीकरण व्हावे आणि महिलांना अधिकाधिक बळ मिळावे हीच सदिच्छा!! 
      चूल आणि मूल ! घरकमातून बाहेर ना पडता सर्व वेळ मुलांना आणि घरातील कामांना देत पूर्वीच्या काळी स्त्रिया , त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव व्हावी बाहेर पडून शिकावे , लढावे, जॉब करावा ही मानसिकता तयार व्हावी म्हणूनच की काय महिला दिन साजरा करण्याची कल्पना असावी. ज्यामुळे महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांना प्रोत्साहन देत पुढे जाण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास जागृत करावा असा हेतू असावा हा महिला दिन साजरा करायला असे वाटते. 
        पण , खरंच का हा हेतू आज पूर्ण झाला आहे का हो ? महिलांना स्वतःला काय वाटते ? मला तर वाटते की नक्कीच काळ बदलतोय पूर्णपणे. महिलांना त्यांच्या हक्क अधिकार यांची पुरेपूर जाणीव झाली आहे. स्वतःच्या क्षमतेची आणि कर्तबगारीची आकलन क्षमता प्रत्येक महिलेच्या मनात जागृत होत आहे. चूल आणि मूल ही संकल्पना कालबाह्य होत आहे. 
       सावित्रीबाई फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले, झाशीच्या राणीने लढायला शिकवले तर कल्पना चावलाने अवकाशात झेप घेत भरारी मारायला शिकवले , आता तुम्हीच सांगा कोणते असे क्षेत्र आहे जिथे महिलांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले नाही असे ? विज्ञान , संरक्षण , अर्थ , परराष्ट्र व्यवहार अशा विभागात कार्यरत असलेल्या कित्येक महिला आपण आज पाहतोय. सुषमा स्वराज यांचे परराष्ट्र धोरण आपण पहिलेच पण आज निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कामकाज करताना प्रत्येक महिला स्वतःवर गर्व करताना दिसून येते. क्रिकेट आणि कुस्तीचे मैदान सुध्दा अपवाद नाही हो आता तर , तिथेही स्वतःचा ठसा भारतीय महिलांनी उठवला आहेच. 
               महिला अत्याचार ! पूर्वी पेक्षा कमी आहे पण हे सुरूच आहे अद्यापही यासाठी आता शासन निर्णय व महिलांनी पण स्वतः पुढाकार घेत सक्षम झाले पाहिजे. लहान पणी पासूनच शाळेत 1 तास मुलींना आत्मसंरक्षण चे धडे देत त्यांना कराटे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. संस्कार आणि नीतिमूल्ये लहान पणी पासूनच शिकवले तर आत्मसात करता येतात. महिलांनी स्वतःला संरक्षित करता यावे यासाठी कुणावर अवलंबून ना राहता , अखंड सावधानता बाळगत प्रसंगी अत्याचार करणाऱ्याला सर्वांनी एकत्र येऊन असा चोप दिला पाहिजे की पुन्हा असे धाडस करण्याचा विचार सुध्दा कुणी करणार नाही . यासाठी महिलांचे संघटन कौशल्य आणि बुध्दी चातुर्य यांचा मिलाफ करून गावोगावी असा दबावगट सक्रिय झाला तर अत्याचार करण्याचा विचार पण कुणी करू शकत नाही हे नक्कीच ! गरज आहे पुढाकार घेत असे संघटन मजबूत करायची आणि शासन निर्णय पाठबळ मिळायची .  
     महिला दिनाच्या पुनश्च शुभेच्छा ! 
कोमल है तू ,कमजोर नहीं , 
  शक्ती का नाम ही नारी है ! 
      सबको जीवन देनेवाली, 
        मौत भी तुझसे हारी है !! 
श्री. व्ही.व्ही. कुलकर्णी, पंढरपूर.
मोबा. 9767473727,
         9768473727.

Post a Comment

0 Comments