LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीतील पत्रकारास मारहाण करून केले जखमी न्यू बागवान मोहल्ला, संत पेठ येथील पाच जणांवर गुन्हा दाखल


पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील पत्रकार रफिक अब्दुलरजाक आतार हे आपल्या भावाशी चाललेले भांडण सोडवण्यास मध्ये गेले असता, त्यांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याची घटना न्यू बागवान मोहल्ला, संतपेठ येथे घडली आहे. येथील पाच जणांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु याचवेळी विरोधी गटाकडून रफिक आतार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे, पंढरपूर शहर पोलिसांच्या वर्तनावर संशय व्यक्त होऊ लागला आहे. 

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी रफिक आत्तार यांचा भाऊ तोफिक आतार यांचे त्यांच्या घराशेजारील रोडवरील साई किराणा स्टोअर्स समोर भांडण लागले असल्याची माहिती रफिक आतार यांना मिळाली. त्यांनी लागलीच ते ठिकाण गाठले. यावेळी तौफिक आतार आणि जुनेद बागवान यांचे भांडण सुरू होते. तौफिक यास काय झाले असे विचारताच, जुनेद बागवान यांनी तू आमच्या मध्ये पडू नकोस असे म्हणत, लोखंडी रॉडने रफिक आतार यांच्या डोक्यावर मध्यभागी मारत, त्याना जखमी केले. याचवेळी उमर सिकंदर बागवान यांनी लोखंडी कोयत्याच्या मुठीने रफिक आतार यांच्या पाठीत आणि गुडघ्यावर मारहाण केली. याचवेळी अमन अनवर बागवान, मज्जिद रहिमान बागवान तसेच मोहसीन मजीद बागवान यांनी  रफिक आतार आणि त्याचा भाऊ तोफिक आतार यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेले रफिक आतार यांचे वडील अब्दुलरजाक आतार यांना जुनेद बागवान आणि अमन बागवान यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची, फिर्याद पत्रकार रफिक आतार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

 या घटनेतील आरोपी जुनेद अन्वर बागवान, उमर सिकंदर बागवान, मज्जित रहिमान बागवान, अमन अन्वर बागवान आणि मोहसीन मज्जिद बागवान सर्वजण रा.न्यू बगवान मोहल्ला, संत पेठ पंढरपूर यांच्यावर भा न्या. सं. कलम  ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),१८९(२), १९१(२),१९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments