सोलापूर : दिनांक, ११ मार्च २०२६
केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने केलेल्या घरगुती व व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध तसेच निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, व जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली.
“राम नाम सत्य है”, “गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा”, “लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो”, “नरेंद्र झाले सरेंडर”, “महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका” देशद्रोही मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनानंतर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने घरगुती व व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत केलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे. अलीकडेच घरगुती (१४.२ किलो) गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपये तर व्यावसायिक (१९ किलो) सिलेंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच प्रचंड महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर ही दरवाढ म्हणजे आणखी एक आर्थिक बोजा ठरला असून सामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
चेतनभाऊ नरोटे पुढे म्हणाले की, गॅस सिलेंडर दरवाढीचा सर्वाधिक फटका घर चालविणाऱ्या भगिनींना बसत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेट कोलमडले असताना गॅसच्या दरवाढीमुळे कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. इंधन, गॅस आणि अन्नधान्य यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना भाजप प्रणित मोदी सरकारकडून त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे देशात जनतेची उघड लूट सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, देशभरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची परिस्थितीही निर्माण होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत असून सिलेंडर बुक करूनही अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी “सिलेंडर उपलब्ध नाही, किमान ३० दिवस लागतील” असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे. काही भागांत गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत, अशी माहिती चेतनभाऊ नरोटे यांनी दिली.
सरकारकडून गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक कुटुंबांना गॅस मिळण्यात अडचणी येत असून काही ठिकाणी चूल थंड पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, असेही चेतनभाऊ नरोटे यांनी नमूद केले.
चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, देशात संभाव्य इंधन संकटाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. LPG च्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेवर होऊन वाहतूक व्यवस्था, अन्नधान्याच्या किमती आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
तसेच आजही देशातील सुमारे ८० टक्के इंधन आयात केले जाते. मोदी सरकार आत्मनिर्भर भारताचा नारा देत असले तरी प्रत्यक्षात पेट्रोल, डिझेल, गॅस व CNG साठी परदेशांवर अवलंबून राहण्याची वेळ देशावर आली आहे. चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून महागाईचे ओझे सर्वसामान्यांवर टाकले जात आहे, अशी टीकाही चेतनभाऊ नरोटे यांनी केली.
देशात इंधनाचा तुटवडा असताना बांगलादेशला लाखो टन इंधन पाठविण्याचे करार करण्यात आले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा देशद्रोहीपणा असल्याचा आरोपही चेतनभाऊ नरोटे यांनी केला. सरकारने सरकारी कंपन्या विकल्या, शिक्षण व्यवस्था कमकुवत केली आणि आता तेल व गॅससाठी परदेशी दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असेही चेतनभाऊ नरोटे म्हणाले.
वाढती महागाई व गॅस दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. “हे सरकार देशाला जनतेच्या लुटीचा अड्डा बनवत आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा नव्या-नव्या मार्गांनी जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे,” असा घणाघातही चेतनभाऊ नरोटे यांनी केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही गॅस सिलेंडर दरवाढ, तुटवडा आणि संभाव्य इंधन संकटाबाबत संसद अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर तात्काळ नियंत्रण आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी दिला.
या आंदोलनात शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणदिरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, एन.एस.यु.आय. अध्यक्ष नागेश म्याकल, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, हरुण शेख, भारती ईपलपल्ली, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, सरचिटणीस अँड. केशव इंगळे, दिनेश म्हेत्रे, राजन कामत, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड, सागर उबाळे, अय्याज आळंद, शरद गुमटे, भीमराव शिंदे, एजाज बागवान, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, ज्योती गायकवाड, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, स्नेहल शिंदे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, प्रकाश गेंट्याल, शिवाजी साळुंखे, राजेश झंपले, ऐजाज बागवान, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, व्यंकटेश बोमेन, कालिदास काळपगार, श्रीनिवास परकीपंडला, पवन सग्गम, नरेश कोकुल, हणमंतु रुपनर, अभिलाष अच्युगटला, चिंटू कांबळे, सुनील डोळसे, सचिन सुरवसे, दत्तात्रय गजभार, इब्राहिम कलबुर्गी, अमर भोसले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments