नुतन पदाधिकारी निवड व जन्मोत्सव सोहळा कश्या प्रकारे साजरा करायचा ह्या करता काल श्री.संत सेना महाराज मठ येथे मिंटीग आयोजित केली होती.
ह्या मिटींगच्या अध्यक्ष स्थान भाई किशोर भोसले यांनी भुषवले त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद यांच्या जन्मोत्सव सोहळा नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे निवड करण्यात आले.
अध्यक्ष - श्री.तुकाराम धोंडीबा चव्हाण
उपाध्यक्ष - श्री.राकेश नागनाथ देवकर
खजिनदार - श्री.अविनाश रमेश शेटे
कार्याध्यक्ष - श्री.साईनाथ अशोक शिंदे
सचिव - श्री.अनिल केशव शेटे
यांच्या निवड करण्यात आली.
सदर मिंटीग मध्ये काही महत्त्वाचे विषयचे ठराव करण्यात आले.
ठराव पुढील प्रमाणे.
1) जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा व ह्या वर्षी मिरवणूक पण चांगल्या उत्सवात काढण्यात यावी.
2) छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवबा काशिद चौकात दोन्ही कडे हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद मध्यवर्ती सोहळा समिती जन्मोत्सव साजरा करणार.
3) जन्मोत्सव सोहळा साजरा करताना कोणत्या संघटनेचे नाव अथवा पदाचे वापर करायचा नाही.
4) निमंत्रण पत्रिका मध्ये समस्त पंढरपूर शहरातील समाज बांधवांचे फक्त आडनाव टाकायचे.
5) कोणत्याही समाज बांधवांनी शुभेच्छाचा बोर्ड किंवा होर्डिंग्ज लावले तर सौजन्य म्हणून हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद जन्मोत्सव सोहळा समिती व समस्त नाभिक समाज पंढरपूर असा उल्लेख करायचा.
6) सर्व समाज बांधवांनी एकजुटीने जन्मोत्सव सोहळा पार पाडायचा आहे कोणीही गट तट करायचे नाही.
असे ठराव करण्यात आले.
सदर मिंटीग साठी.
अध्यक्ष.भाई किशोर भोसले,जेष्ठ.बबन काका शेटे, बाळासाहेब देवकर,जितेंद्र भोसले,महेश माने,युवराज हडपद,धर्मराज सुरवसे,संतोष माने,प्रशांत खंडागळे,सतीश चव्हाण,सोमनाथ चिखले,मनोज गावटे,महादेव शिंदे,किरण गाडेकर,सागर शिंदे,औदुंबर चौधरी,रोहन देवकर,आदी समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments