LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*आमदार अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला*(माढा मतदारसंघातील अनेक रखडलेल्या प्रश्नांबाबत भेट घेतली)



प्रतिनिधी/- 
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, ना.एकनाथजी शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नांबाबत निवेदन देऊन निधीची मागणी केली.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या :

१) माढा शहरातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.

२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा शहरात भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी ₹१० कोटी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. हे स्मारक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी ठरेल.

३) श्रीपुर-महाळुंग नगरपंचायतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जागा खरेदी व बांधकामासाठी ₹५ कोटी निधी देण्याची मागणी करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांना अधिक कार्यक्षम व दर्जेदार सेवा मिळू शकतील.

४) माढ्यातील मनकर्णा नदी परिसराचे सुशोभीकरण व घाट बांधणीसाठी ₹१० कोटी निधीची मागणी करण्यात आली. या कामामुळे धार्मिक व पर्यटन विकासाला चालना मिळून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित होईल.

५) माढा नगरपंचायतीसाठी नवीन प्रशासकीय इमारत आणि सुसज्ज सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी ₹१० कोटी निधी देण्याची मागणी करण्यात आली, ज्यामुळे शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला गती मिळेल.

या सर्व मागण्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन माढा मतदारसंघाला भरघोस निधी देण्याचे सांगितले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments