पंढरपूर :
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील विलास (बापू) देशमुख यांची कन्या कु. सानिका विलास देशमुख हिने महाराष्ट्र पोलीस पुणे शहर भरतीमध्ये एनटीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे तिची पोलीस दलात निवड झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सानिकाच्या या यशाबद्दल ईश्वर वठार येथे तिचा व वडील विलास देशमुख आई माधवी देशमुख भाऊ रितेश देशमुख बहिण ऋतुजा देशमुख कुटुंबाचा सन्मानपूर्वक सत्कार बाळासाहेब खांडेकर यांच्या परिवारातर्फे करण्यात आला.
यावेळी बोलताना बाळासाहेब खांडेकर म्हणाले,
आज आपल्या ईश्वर वठार गावासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
कु. सानिका विलास देशमुख हिने महाराष्ट्र पोलीस पुणे शहर भरतीमध्ये एनटीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
हे यश सहजासहजी मिळत नाही. यामागे तिची अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आहे. आजच्या तरुण पिढीसाठी सानिका ही एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण आणि करिअरमध्ये पुढे येऊन असे यश संपादन करणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सानिकाने दाखवून दिले आहे की, इच्छाशक्ती आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते.
मी सानिकाचे आणि तिच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
तिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
तिने भविष्यातही असेच यश संपादन करत राहावे आणि आपल्या गावाचे, जिल्ह्याचे व देशाचे नाव उंचावत राहावे
यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक भारत (अण्णा) देशमुख, बाळासाहेब खांडेकर, विलास देशमुख, भागवत देशमुख, भालचंद्र खांडेकर, रितेश देशमुख, तुषार देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments