पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आगामी सण उत्सव च्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे रोपळे तुंगत गोपाळपूर देगाव कासेगाव या ठिकाणी कारवाई करून देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 22 हजार 700 रुपयांचा अवैध दारू साठा पोलिसांनी जप्त केलेला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे
पाच आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर एपीआय श्री शहाजी गोसावी एपीआय श्री सोनवणे साहेब पीएसआय विक्रम वडणे पोलीस हवालदार सुहास देशमुख सागर गवळी विजयकुमार आवटी चालक पोलीस कॉन्स्टेबल गोडसे यांच्या पथकाने केली

0 Comments