LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अण्णासाहेब पाटील महामंडळातील जाचक अटींमुळे मराठा तरुण आर्थिक कोंडीत; अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार करण्याचा इशारा.

पंढरपूर:- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटी, निधीची कमतरता आणि रखडलेला व्याज परतावा यामुळे मराठा समाजातील नवउद्योजक तरुणांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे या तरुणांच्या स्वप्नांचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करत, अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना अत्यंत तीव्र निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढण्यात आले.  निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे:--                                       1) LOI मंजूरितील दिरंगाई: महामंडळाच्या नियमानुसार पंधरा दिवसांची मुदत असताना हेतू पुरस्सर विलंब लावून मुदत संपल्यावर मंजुरी दिली जाते.                            ज्यामुळे बँकांमध्ये कागदपत्रे सादर करणे अशक्य होते.                    2) जाचक अटिंचा पाऊस:- महिला उद्योजकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची सक्ती 7/12 व 8/- अ  उताऱ्याची अट आणि वाहन कर्ज बंद करण्याचा निर्णय हे मराठा तरुणांना मागे खेचणारे आहेत.    3) भेदभावाची वागणूक:- इतर महामंडळाच्या कर्ज प्रक्रिया सुटसुटीत असताना केवळ अण्णासाहेब पाटील महामंडळासाठीच 'उत्पन्नाच्या तीन पट कर्ज' यांसारखे जाचक नियम का? असा सवाल विचारण्यात आला आहे.                               4) शाळा सोडल्याचा दाखला:- वयाचा पूरवा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (LC) कोणत्याही अटीशिवाय सर्व स्तरावर ग्राह्य धरला पाहिजे.       5) व्यवस्थापकीय संचालकांची बदली:- सध्याचे व्यवस्थापकीय संचालक (MD) हे जाणीवपूर्वक लाभार्थ्यांची अडवणूक करत असून त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.                     ☆आंदोलनाचा इशारा मराठा: तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका? असा इशारा महासंघाने दिला आहे; जर येत्या 7 दिवसांत या सर्व जाचक अटी रद्द केल्या नाहीत आणि रखडलेला व्याज परतावा जमा केला नाही; तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणि एल्गार पुकारला जाईल, असा सज्जड दम अर्जुनराव चव्हाण यांनी दिला आहे.                                या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.                                 यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, सचिन गंगथडे जिल्हा उपाध्यक्ष, गुरुदास गुटाळ जिल्हा सचिव, शिवाजी मोरे युवक जिल्हाध्यक्ष, हनुमंत कदम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, सचिन डोरले तालुका अध्यक्ष मंगळवेढा, अमोल सातपुते शहराध्यक्ष मंगळवेढा, अमोल पवार शहराध्यक्ष, शुभम ताटे युवक शहराध्यक्ष, शामराव साळुंखे शहर उपाध्यक्ष, पांडुरंग शिंदे शहर संघटक, नागेश गायकवाड शहर रिक्षा संघटना अध्यक्ष, नानासो शिंदे व्यापार व उद्योग आघाडी अध्यक्ष, शंकर गोवे, अजित लेंडवे, मालोजी शेंबडे, रोहित जाधव, इ. कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments