पंढरपूर नगरपालिकेच्या वीस मार्च 2026 रोजी पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मंदिर परिसरातील प्रस्तावित कॅरिडॉरसह शहरातील अनेक महत्त्वपूर्ण विकास कामावर चर्चा झाल्याचे दिसून आले.पंढरपूर नगरपालिकेकडे शहरातील विविध ठेकेदार तसेच पुरवठादार यांचे नगर पालिकेकडे 41 कोटी रुपयांची बिले थकीत असल्याची बाब स्पष्ट झाल्याने पुढील विकास कामांसाठी निधीची उपलब्धता लक्षात घेत नियोजन करावे लागणार आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकास कामे करताना मर्यादा पडणार आहेत आणि यातूनच सर्वसाधारण सभेत विकास कामे करताना जी कामे अत्यावश्यक आहेत आणि तातडीने करणे गरजेचे आहे अशा कामांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी सभागृहात केल्याचे दिसून आले.
पंढरपूर नगरपालिकेकडून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत असा प्रश्न देखील नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी उपस्थित केला.
पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात येणाऱ्या वाहनांना आकारल्या जाणाऱ्या पार्किंगची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत रित्या पार्किंगची वसुली बंद आहे परंतु शहराच्या अनेक भागात बोगस पावत्या देऊन तसेच बेकायदा वसुली सुरू असल्याचा आरोप नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी केला. जर अशा पद्धतीने काही खाजगी व्यक्ती परस्परच वसुली करत असतील तर पंढरपूर नगरपालिकेने भाविकांना कुठलाही त्रास न होता पार्किंग फी कशा पद्धतीने आकारली जाईल यासाठी उपाययोजना करून निविदा प्रक्रिया राबवावी.पंढरपूर नगर पालिकेच्या मालकीच्या शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत.करारभंग केलेल्या अथवा करार संपलेल्या अशा जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर उभारले जावेत त्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी केली.
या साधारण सभेत पंढरपूर शहराचा मोठा भाग चंद्रभागा नदीच्या निळ्या पूर रेषेत समाविष्ट करण्यात आल्याने त्या ठिकाणच्या रहिवाशांना नगर पालिकेकडून बांधकाम परवाने मिळण्यात मोठी अडचण येत आहे.तरी राज्य शासनाकडे या बाबत त्वरित पाठपुरावा केला जावा अशी मागणीही नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी केल्याचे दिसून आले.

0 Comments