पंढरपूर येथील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोसले यांना महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब गटाच्या शिवसेनेचे ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्या मुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार या भागातील जेष्ठ नेते जे के गायकवाड यांच्या शुभहस्ते हार श्रीफळ देऊन करण्यात आला. या वेळी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले,शालीवाहन कोळेकर, दादासाहेब कांबळे, रोकडे, विजय पाटील , दत्ता शिंदे, प्रज्योत भोसले, आकाश भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ओ बी सी बांधव एक संघ पणे माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या शिवसेना गटाच्या पाठीशी उभी करण्यासाठी प्रदीप भोसले यांना हे पद दिले गेले आहे.प्रदिप भोसले यांचे संघटन कौशल्य आहे. ते शांत संयमी स्वभावाचे आहेत. प्रदीप भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील अनेक ओ बी सी समाजातील मान्यवर लवकरच शिंदे गटात सामील होतील.
0 Comments