LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवणे बाबत राज्य सरकारने नियमावली तयार करावी.

पंढरपूर प्रतिनिधी:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाने तातडीने कडक नियमावली तयार करावी. जेणेकरून सामाजिक सलोखा राहील काही विघ्नसंतोषीलोक महाराजांचे पुतळ्याचे नाव खाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा तसेच आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद करण्यासाठी खाली नियमावली तयार करावी.             1)  पुतळा जेथे बसवायचा आहे ती जागा अगोदर निश्चित करून रीतसरर परवानगी घ्यावी.             2) जागा शासकीय असावी वैयक्तिक जागेवरती सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसू नये.             3) पुतळा प्लास्टिक किंवा फायबरचा नसावा.                     4) पुतळा दर्जेदार धातूचा किंवा पाषाणाचा असावा.                     5) भविष्यात पुतळ्याची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी.    6) जो व्यक्ती किंवा मंडळ पुतळा बसणार आहे त्यांच्याकडून देखभाल करण्याचे करारपत्र घ्यावे. 7)जातीय तेढ निर्माण होईल अशा कोणत्या परवानगी देऊ नये.         8) महाराजांच्या पुतळ्याशेजारी चित्र संग्रहालय, ग्रंथालयाची निर्मिती करावी.             9)पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी शासनाने निधीची तरतूद करावी. असे अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.  या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष- अर्जुनराव चव्हाण, शिवाजीराव मोरे, हनुमंत कदम, सचिन गंगथडे, वैभव चव्हाण, रोहित चव्हाण, सुहास निंबाळकर, संतोष जाधव, अमोल पवार, नानासो शिंदे, अमर शिंदे, शुभम ताटे, काका यादव, पांडुरंग शिंदे, शामराव साळुंखे, नागेश गायकवाड, सौ. प्रभावती गायकवाड, रतन थोरवत, बालाजी शिंदे, पै. चरण साळुंखे, दिपक कोठावळे, दिपक गोरे, सुमित गाजरे,प्रज्वल घाडगे, मालोजी शेंबडे, अनिल उकरंडे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments