पंढरपूर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरीय क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले समाज रत्न पुरस्कार या वर्षी भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश महानिरीक्षक व
पंढरपूर सोनार समाज उपाध्यक्ष. लंकेशदादा काकासाहेब बुराडे यांना जाहीर झाला असून १४ एप्रिल रोजी शिवतिर्थ पंढरपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या शानदार कार्यक्रमात तो त्यांना वितरित करण्यात येणार असल्याचे
प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. नगरसेवक डि राज सर्वगोड यांनी लेखी पत्रा द्वारे कळविले आहे....
लंकेशदादा बुराडे यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे..
या पुर्वी त्यांना
सोनार समाज रत्न.
मुंबई चा कनक रत्न
कल्याण चा समाज भूषण.
अंबाजोगाइचा युवा सुवर्ण रत्न.
आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लंकेशदादा बुराडे यांना
समाज रत्न पुरस्कार जाहीर होताच त्यांचे सोनार समाज संस्था अध्यक्ष अरुण शेठ मंजरतकर उपाध्यक्ष संजयशेठ ढाळे
भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब बुराडे.
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती चे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट विशालजी वेदपाठक.
शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे तालुका प्रमुख बंडूदादा घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर आदींनी अभिनंदन केले आहे....

0 Comments