पंढरपुर येथील ग्रामिण साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव बागल सर लिखित " दीपस्तंभ " या चरित्रामक कांदबरी लेखनास पुरस्कार प्राप्त झाला आहे..दिवसभर चालणार्या ह्या साहित्य संमेलनात मा.प्रा डॉ माधव गाडेकर प्रा श्रीधर गायकवाड मा अंगद गायकवाड यांच्या हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमात मा बागल सर यांच्या उत्कृष्ट कांदबरी लेखना साठी गौरव करण्यात येणार आहे.
अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे ग्रामीण साहित्य घरोघरी पोहोचले आणि ज्यांच्या मराठी साहित्याचा लौकिक महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर झाला अशा ग्रामिण साहित्यीQक प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या साहित्याला यापूर्वी विविध ४२ राज्यस्तरीय
पुरस्कार व सन्मान मिळालेले असून प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या कादंबरीस हा मानाचा समझला जाणारा पुरस्कार जाहीर झाला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 Comments