सोलापूर, दिनांक, ०९ एप्रिल २०२६
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत सोलापूर शहर - जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासह विविध ब्लॉक आणि फ्रंटल अध्यक्ष पदांसाठीच्या मुलाखती उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी निरीक्षकांचे स्वागत केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार पक्ष संघटन अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या संघटन सृजन अभियानाअंतर्गत सोलापूरमध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष, तसेच ब्लॉक व फ्रंटलच्या विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखती AICC निरीक्षक देवाशीष पटनायक, प्रदेश निरीक्षक माजी आमदार धीरज देशमुख, प्रदेश निरीक्षक यशराज पारखी, प्रदेश निरीक्षक भाऊसाहेब आसबे आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश नवगिरे यांनी घेतल्या.
काँग्रेसची विचारधारा व जनहिताच्या धोरणांना अधिक प्रभावीपणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस, दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments