LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरमध्ये डिजिटल जनगणनेला प्रारंभ प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी रोकडे यांचे आवाहन



पंढरपूर:(दि.०२) :-  केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पंढरपूर शहरात 1 मे  पासून डिजिटल जनगणना मोहिमेस प्रारंभ झाला आहे. नागरिकांनी https://se.census gov.in या संकेतस्थळावर जाऊन 34 प्रश्नांची माहिती भरावयाची आहे. नोंदणी पूर्ण झालेनंतर मिळणारा युनिक कोड पुढील टप्प्यात प्रगणकाला देणे आवश्यक आहे.प्रगणकांना आपली वैयक्तिक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

    सन 2027 रोजी होणारी सदरील जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे . प्रथमच अशा स्वरूपात ही प्रक्रिया राबविली जात आहे. जनगणनेचा पहिला टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत होणार आहे. त्या दरम्यान नागरिकांना स्वयं नोंदणीची (स्वगणना) सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन 34 प्रश्नांची माहिती भरावयाची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा युनिक कोड (SE ID) पुढील टप्प्यात प्रगणकाला देणे आवश्यक आहे. 

आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक , नगराध्यक्ष  प्रणिता भालके तसेच सर्व समितीचे सभापती व नगरसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची प्रशासनाने स्वगणना केलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यात दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. स्वयं नोंदणी केलेल्या नागरिकांना केवळ युनिक कोड देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
 वैयक्तिक माहिती केवळ सांख्यिकी हेतूसाठी या जनगणनेत नागरिकांची वैयक्तिक माहिती, कुटुंब रचना, घराचा प्रकार, सदस्यांची संख्या तसेच घरातील उपलब्ध सुविधा याचा तपशील गोळा करण्यात येणार आहे. सदरची माहिती केवळ सांख्यिकी हेतूसाठी वापरली जाणार असून गोपनीयतेची पूर्ण हमी देण्यात आली आहे.
  दरम्यान, सध्या पर्यवेक्षक व प्रगणक यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सदर जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज करण्याकरिता पंढरपूर शहरामध्ये 28 पर्यवेक्षक व 165 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतात जनगणनेची परंपरा 1872 पासून सुरू असून यंदाची जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची 16 वी व स्वातंत्र्यानंतरची  8 वी जनगणना ठरणार आहे.

  '' पंढरपूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जनगणनेच्या कामकाजाकरिता नियुक्त प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना वैयक्तिक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.,,

Post a Comment

0 Comments