LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने करा, लोडशेडिंग तात्काळ कमी करा.* 👉 *ग्रामीण भागातील विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे खासदार प्रणिती शिंदे आक्रमक*


सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपुरा वीजपुरवठा आणि वाढत्या लोडशेडिंगच्या समस्येबाबत महावितरण प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यांमध्ये सध्या वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

वारंवार लोडशेडिंगमुळे स्थानिक नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून शेतीसाठी आवश्यक पाणी उचलण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही अडचणी निर्माण होत असल्याने शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची बाब खासदार प्रणिती शिंदे यांनी ठळकपणे मांडली आहे.

याशिवाय, ग्रामीण भागात वारंवार बंद पडणाऱ्या डीपींची (वितरण ट्रान्सफॉर्मर) तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सध्याच्या लोडशेडिंगमध्ये तात्काळ कपात करून ग्रामीण भागात नियमित आणि पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी महावितरणला स्पष्टपणे कळविले आहे.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments