LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

हर किसिको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में , खूषनसिब है वो जिनको , है मिली ये बहार जिंदगी में !

       , प्रेम ,विश्वास ,काळजी ,आदर या भावनांचा उद्रेक होतो व आपुलकी जिव्हाळा निर्माण होतो. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात हे सुख येईलच असे होत नाही बिलकुल. खूपच क्वचितच असे दोन प्रेमिजीव लग्न करतात व हे प्रेमाचे नाते विश्वासाने काळजीने आयुष्यात शेवट पर्यंत साथ देत सांभाळून राहतात. हे खऱ्या अर्थानं नशीबवान बरं का ! पूर्वीच्या काळात संस्कार शिदोरी मुळे , मोबाईल अभावाने असे प्रेम भावना व्यक्त केल्या जात नव्हत्या सहजपणे. एवढेच काय आई बाबा यांचा शब्द प्रमाण मानला जायचा त्यामुळे त्यांच्या धाकाने असे कित्येक प्रेमवीर गप्प राहायचे , मनातील इच्छा अपेक्षा ह्या धाक व संस्कार शिदोरीच्या कारणाने बिघडण्याच्या सुरुवातीलाच माघार घेत शांत संयमी भूमिका घेत कोणतीही वाईट गोष्ट करण्यापासून दूर राहत होते. पण हा पूर्वीचा काळ हो , आता काय होतंय ? किती फरक जाणवतोय अगदी सहज पावलोपावली ? 
              संस्कार नाही, पालकांचा आदर नाहीच , नीतिमूल्ये तर माहितीच नाहीत , इच्छा अपेक्षा यांचा शेवट ती गोष्ट साध्य करूनच होतो मग भलेही त्यासाठी काहीही कसेही करावे लागले तरी करतातच. अगदी वाईट मार्गाने आपले साध्य करायचे पण हार ना मानता प्रसंगी बळजबरी, अन्याय ,अत्याचार एवढेच नव्हे तर व्यभिचार पण राजरोस होत आहेत. खरोखर देवाला विचारलं जातंय की ,
दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन मे समाई 
काहे को दुनिया बनाई ? 
                खुप जुने गाणे पण आत्ताच्या काळात हे शब्द ना शब्द खरा होतोय.होणार का नाही , आपल्या पूर्वजांनी भावी आयुष्यात काय होईल याचा अंदाज अगदी अचूकपणे वर्तवला होता हेच सत्य आहे . बदलत्या परिस्थितीचा विचार करता हे गाणे खरेच आहे. 
                 प्रेम म्हणजे नेमकी भावना काय ? याचे उत्तर आजच्या तरुणाईला विचारले तर एकच उत्तर असेल ते म्हणजे शारीरिक गरज,आकर्षण ! यापेक्षा वेगळे उत्तर या जमान्यात असणे शक्यच नाही. कारण , मोबाईल संस्कृतीने पूर्णतः वेडे केले आहे सर्वांना. आवश्यकते पेक्षा दुनिया लहान झालीय ,सर्व काही शक्य आहे. व्हिडिओ कॉल ने जग लहान केले आहे . 
फुल तुम्हे भेजा है खत में! 
      फुल नही ,मेरा दिल है !! 
    प्रेमपत्र ! आता असे कुणाला पत्र लिहून प्रेम व्यक्त करता येईल का हो ? कारण मोबाईल मेसेज मुळे व्यक्त होणे पण अगदी सहज शक्य झाले आहे , त्यामुळे पत्रलेखन संस्कृती पूर्णतः विस्मरणात गेली आहे. कबुतर चिठ्ठी बरोबरच आता पत्र पण इतिहास जमा झाली असे म्हणता येईल. पत्रातून भावना व्यक्त करताना ,लिहिताना मनापासून विचार आठवण व्हायची खऱ्या अर्थाने,पण आता अशी भावना निर्माणच होत नाहीय बिलकुल. 
       आणखी एक हिंदी गीत खूप छान मतितार्थ व प्रेमवीर लोकांसाठी खास संदेश देणारे होते जुन्या काळात ,
छोड दे सारी दुनिया किसी के लिये ,
      ये मुनासिब नहीं,आदमी के लिये ! 
      देवदास होऊन उदास ,वैफल्यग्रस्त प्रेमवीर लोकांसाठी हा खास संदेश होता . एका व्यक्तीसाठी स्वतःचा जीव पणाला लावून बळी पडू नका, आयुष्य जी दैवी देणगी आहे ती भरभरून जगून घ्या आनंदाने. पण आता नवी संस्कृती आणि नवे गाणे पण आले , 
     अगर तुम मिल जाओ, 
        जमाना छोड देंगे हम ! 
 कित्ती विरोधाभास जाणवतोय ना ,वैचारिक आणि सांस्कृतिक ? खरय,काळ बदलला आहे जरूर .माणसे तीच आहेत,पण शिक्षण पुढे जातंय व संस्कार मागे पडत आहेत. ज्या गुरुजींच्या छडी ने विद्यार्थी घाबरत अध्ययन करायचे ,शिकायचे ते आजचे सो कॉल्ड सर , टीचर आज विद्यार्थ्यांना घाबरुन आहेत हीच शोकांतिका आहे. कारण ,आपणच आपल्या मुलाला का मारले ह्याचा जाब विचारतो ना ? कुणाचा तरी धाक / आदर असल्याशिवाय काहीच शिकता येत नाही ही बाब आपण विसरतोय, हो ना ? 
           आजची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी घरातील ज्येष्ठ माणसांनी पुढाकार घेऊन मुलांना लहानपणीपासूनच समजून घेण्याची गरज आहे. आजी आजोबांचा सहवास , आईचे प्रेम , बाबांचा विश्वास, शिक्षकांचा आदरपूर्वक धाक , अभ्यासाने शिकून मोठे होण्याची आस हेच आपल्या पिढीला पुढे तारून नेईल . अन्यथा , पुढे काय होणार याचा विचार करता येणार नाही. जगाला नाही , निदान आपल्या घरात तरी आपण काळजीने असे वागू शकतो . तुम्हाला काय वाटते ? बघा ,विचार तरी करा. 
श्री.व्ही.व्ही.कुलकर्णी,पंढरपूर.
मोबा.9767473727,
        9768473727.

Post a Comment

0 Comments