LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन*



सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तथा भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवार, दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता काँग्रेस भवन, सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पंडित नेहरू व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, शिवशंकर अंजनाळकर, मिडीया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष रुस्तुम कंपली, भीमराव शिंदे, संजय गायकवाड, सागर उबाळे, नुरअहमद नालवार, सुमनताई जाधव, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, छाया हिरवटे, रफिक चकोले, कालिदास काळपगार, मेघश्याम गौडा, नागेश बोंमड्याल, शिवाजी साळुंखे, नागनाथ शावणे, शुकुर शेख, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे, आकाश वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments