LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या विकासासाठी हजारो कोटी निधीची केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे आमदार समाधान आवताडे यांची मागणी.



मंगळवेढा ( प्रतिनिधी):-  पंढरपूर तीर्थक्षेत्र व मंगळवेढा संत भूमीतील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या चौपदरीकरण व बाह्यवळण रस्त्याच्या विकास कामांसाठी हजारो कोटी निधीची मागणी केंद्रीय रस्ते , वाहतूक व राजमार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज केली.

आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणीत पंढरपूर तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्र व भारतातील भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी  दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने पंढरपूर येथे येतात. पंढरपूरकडे येणारी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग व्यापक रूंदीकरणाची नाहीत.त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून अपघात दुर्घटना वाढल्या आहेत. अरुंद रस्त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.  पंढरपूर तीर्थक्षेत्र विषयी धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून वाहतूकीचा सकारात्मक विकास करणे आवश्यक आहे. 

राष्ट्रीय महामार्ग एन एच ५६१ ए टेंभूर्णी पासून पंढरपूर - मंगळवेढा - उमदी महामार्गाचे चौपदरीकरण आवश्यक आहे. हा राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने अपघाताच्या प्रमाण वाढले आहे. आषाढी,कार्तीकी व अन्य एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी संप्रदायातील दिंडी, पालखी यांच्या सोयीसाठी टेंभूर्णी पासून पंढरपूर -मंगळवेढा - उमदी पर्यंत चौपदरीकरण रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर करावा. तसेच पंढरपूर शहरालगत बाह्यवळण रस्त्याची आवश्यकता असून पंढरपूर शहरातील वाहतूक सुलभता करिता गरजेचे आहे.

तसेच मंगळवेढा या संत भूमीतील रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ कलम १५(१) अन्वये मंगळवेढा नगरपरिषद परिघस्त सोलापूर जिल्हा प्रादेशिक योजना सन २००५ साली मंजूर आहे.सदर योजना अंतर्गत मंगळवेढा शहरास ३० मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने मंगळवेढा - पंढरपूर रस्त्यापासून पश्चिम दिशेस जुना घरनिंकी रस्त्या वरून मंगळवेढा - रत्नागिरी रस्त्यापर्यंत चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करावा. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन याच बाह्यवळण रस्त्यालगत करित असल्याने तात्काळ निधी मंजूर करणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे टेंभूर्णी पासून पंढरपूर -मंगळवेढा - उमदी चौपदरीकरण रस्ता मरवडे गावाच्या बाह्यवळणाने विकसित करावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
--------
बातमीत ना. नितीन गडकरी व आ. समाधान आवताडे यांचा फोटो वापरावा

Post a Comment

0 Comments