सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅड रेस या तांत्रिक स्पर्धेत न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक, कोर्टी, पंढरपूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत *प्रथम क्रमांक* पटकावला.
या स्पर्धेत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विजय चव्हाण, विवेक नागणे आणि अमितेश कदम या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कॅड डिझाईन, अचूकता, वेळेचे नियोजन आणि तांत्रिक कौशल्य यांचा प्रभावी वापर करत स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले.
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. व्ही. एच. लोंढे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आपले मनोगत व्यक्त केले, *"आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने सातत्याने दाखवलेली गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची मेहनत यातून हे यश साकार झाले आहे. विद्यार्थ्यांनी अशाच तांत्रिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे नाव उंचावत राहावे, यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा."*
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले, *"विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे संस्थेच्या दर्जेदार शिक्षण पद्धतीचे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशाच जिद्दीने आणि आत्मविश्वासाने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा आणि संस्थेचा, तसेच स्वतःच्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवावा, हीच सदिच्छा."*
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अकॅडमी कोऑर्डिनेटर मा. श्री. व्ही. एन. बाड, सर्व विभागप्रमुख, टीचिंग स्टाफ तसेच नॉन टीचिंग स्टाफ यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments