LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🚩 ही फक्त दहीहंडी नव्हती… हा होता पंढरपूरच्या तरुणाईच्या ताकदीचा विराट हुंकार!🚩



सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ, पंढरपूर व स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशन, पंढरपूर-मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दहीहंडी उत्सवात ‘नवचैतन्य तरुण मंडळा’ने आपल्या जिद्दीच्या आणि एकजुटीच्या जोरावर दहीहंडी फोडत पहिला मान पटकावला! 🏆🚩


या भव्य सोहळ्यास नगराध्यक्षा सौ. प्रणिता भगीरथ भालके, जिल्हा परिषद सदस्य व्यंकट अण्णा भालके, नगरसेवक सुधीरजी धोत्रे, संजय बंदपट्टे, किरणराज घाडगे, प्रसाद भैया कळसे, विनायक देवमारे, ओंकारजी जोशी, लोकेशजी यादव, राहुलजी शिंदे नाईक, समाजसेवक गणेश अंकुशराव, प्रशांत शिंदे, तसेच संतोष धोत्रे, सतीश शिंदे, युवराजजी भोसले, श्रीनिवास उपळकर, दत्ता भोसले यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली.


स्वर्गीय भारत नाना भालके यांनी जनतेशी जपलेले आपुलकीचे नाते, कार्यकर्त्यांशी असलेली बांधिलकी आणि समाजासाठी काम करण्याची शिकवण पुढे घेऊन जाण्याचा आमचा निर्धार कायम आहे.


आगामी काळातही जनतेच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहून, तरुणाईला बळ देत आणि पंढरपूर-मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्षाची ही वाटचाल अधिक जोमाने सुरूच राहील! 🚩🔥

जनतेचा आशीर्वाद आहे… कार्यकर्त्यांची ताकद आहे…
म्हणूनच पंढरपूर-मंगळवेढ्याच्या विकासाचा निर्धार अढळ आहे! 💪🚩

🙏 दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून प्रेम आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार!

🚩 जय श्रीकृष्ण!
🚩 जय शिवराय!

Post a Comment

0 Comments