LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर येथील यमाई तलाव व लगत असलेली जागा गोशाळेसाठी मंदिर समितीला दिल्यास जन आंदोलन करण्याचा यमाई तलाव बचाव समितीचा इशारा*


पंढरपूर येथील यमाई तलाव व लगत असलेली  जागा गोशाळेसाठी मंदिर समिती देऊ नये म्हणून पंढरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते सुजित कुमार सर्वगोड नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर, अमोल डोके, ॲड गुरुदास अभ्यंकर,धर्मराज घोडके,सौरभ थिटे इब्राहिम बोहरी शरद माने मालोजी शेंबडे,गणेश शिंदे नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्तिकीयन एस यांना निवेदन दिले

पंढरपूर शहारातील यमाई तलावा जवळील जागा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेचा विस्तार करणेसाठी गट नं.१६१ मधील ३.१२हेक्टर जागा देण्याबाबत महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली या बैठकीमध्ये मंदिर समिती व काही महाराज मंडळी यांच्या मागणीवरून १५ दिवसाच्या आत जागा मागणीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा म्हणून सुचना दिलेल्या आहेत. शासनाच्या या निर्णयाने समस्त पंढरपूरकरांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. 

वास्तविक पाहता यमाई तलाव हा ऐतिहासिक तलाव असून इंग्रजांच्या काळामध्ये संपूर्ण पंढरपूर शहराला पाणी पुरवठा व्हावा म्हणून या या जागेच्या तलावास बांध घालून १८८२ सालापुर्वी हा यमाई तलाव तयार करून पंढरपूर शहराला पाणी पुरवठा केला जात होता. इंग्रज काळापासून सदर जागेवर महाराष्ट्र शासन अशी नोंद असली  तरी सुध्दा पुर्वी पासून नगरपरिषद मालकिची व वहीवाटीची असल्याने नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. आजही याजागेची देखभाल दुरूस्ती नगरपरिषदेच्या फंडातून केली जाते. तसेच माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे पंढरपूर मध्ये कार्यक्रमासाठी आले असता माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अजितदादा पवार यांना हा जुना तलाव दाखविला व पंढरपूर शहरामध्ये असलेले नागरिक व दर्शनाच्या निमित्ताने येणारे लाखो भाविक यांना श्रीविठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासोबतच पर्यटनाचाही आनंद मिळावा म्हणून राज्य सरोवर संवर्धन योजनेतून हा तलाव कोट्यावधी रूपये खर्च करून विकसित केला आहे. व आज शासनाच्या माध्यमातून तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तुळशीवृंदावन सारखे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. तसेच याठिकाणी असणाऱ्या वॉकिंग ट्रॅकवर हजारो महिला व पुरूष नागरिक सकाळ सध्यांकाळी फिरणेसाठी याचा वापर करीत आहे
पंढरपूर शहरामध्ये  केवळ एकमेव यमाई तलावाची जागा राहिली असून ज्यावर नागरिक सुरक्षितपणे व्यायाम, फिरणे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळासाठी मोठ्या प्रमाणावर यमाई तलावावर येत असतात. त्यामुळे ही जागा गोशाळेसाठी देणे योग्य होणार नाही. वास्तविक पाहता पंढरपूर नगरपरिषदेने मंदिर समितीला यापुर्वी गोशाळेसाठी 3 एकर जागा ठराव करून दिलेली आहे. मंदिर समिती मार्फत श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, संत विद्यापीठ व दर्शन मंडप याच्या उभारणीसाठी वरील जागा देऊ केली होती. सन २००९-२०१० च्या श्रीसंत तुकाराम महाराज चर्तुशताब्दीच्या आराखड्यात वरील कामाचा समावेश केला होता. सद्य परिस्थिती पाहता तेथे काही प्रमाणात गाईचे पालन केले जाते. व तेथील येणाऱ्या दुध श्रीविठ्ठल रूक्मिणीच्या पुजेसाठी पाठविले जाते. जास्त प्रमाणात दुध विक्री स्थानिक विक्रेते यांना विकले जाते. या गोशाळेवर मंदिर समितीचे कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण नाही. या गोशाळेबद्दल व इथल्या गोपालनाबद्दल अनेक तक्रारी आहेत. येथील काही कर्मचाऱ्यांनी गोपालनकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गाई वासरे मरण पावले आहेत. व या कारणासाठी काही कर्मचारी निलंबित सुध्दा झाले आहेत. यासर्व बाबी विचारात घेता सदरची जागा ही गावाबाहेर म्हणजे तलावाच्या पश्चिम दिशेस असल्याने व याठिकाणी यापुर्वी कुठलीही लोकवस्ती नसल्याने ही जागा नगरपरिषदेने गोशाळेसाठी दिलेली होती. परंतू आत्ताची परिस्थिती पाहता या तलावाच्या चहू बाजूने  जिल्हा सेशन कोर्ट  मोठ्या प्रमाणात लोक वस्ती झाली आहे. 
या यमाई तलावावर देशी, विदेशी पक्षी वास्तव्यास असतात तसेच हे पक्षी पाहण्यासाठी नगरपरिषदेने वॉच टॉवर उभा केलेले असून या वॉच टॉवरचा वापर शहरातील पक्षी मित्र संघटना नित्यनियमाने फॅमिलीसह करत असतात. 
त्यामुळे पुन्हा गोशाळेसाठी वाढिव  ३ हे १२ आर जागा देणे उचीत होणार नाही उलटपक्षी मंदिर समितीच्या वाखरी, गोपाळपूर, देगाव व पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी मंदिर समितीच्या मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. या जमिनी मंदिर समितीने खंडाने (भाड्याने) देऊन भाडेचे उत्पन्न मंदिर समिती घेत आहे. त्यामुळे पुर्वी नगरपरिषदेने दिलेली गोशाळेची जागा सुध्दा काढून घेवून यमाईतलावाचे सुशोभिकरणाच्या कामात वापर करावा. कारण याठिकाणी गोशाळा झाल्यास त्याचे मलमुत्र, शेणघाण तलावामध्ये जावून तलावातील जल व वायू प्रदुषण होणार आहे. 
शासनाने यमाई तलाव व परिसरमध्ये वाढती उपनगरे व या उपनगरात वाढणारी लोकसंख्या व पुढील ३० ते ४० वर्षाचा विचार करून करून भविष्यात नागरिकांना द्याव्या लागणाऱ्या सेवासुविधा याचा साकल्याने विचार करून याठिकाणी शासनाच्या वतीने पिकनिक पाईट, ॲडीशनल वॉटर सप्लाय, टँक डेव्हलपमेंट (तलाव विकसित) करणे यासारखी आरक्षणे जागेवर टाकलेली आहेत. यमाई तलाव सुशोभिकरण करणे तलावालगत असलेल्या जागेत ऑक्सिजन पार्क उभारणे, खुल्या जागेत व्यायाम शाळा करणे, तलावालगत असलेल्या तुळशीवृंदावनच्या भरावयाचे सुशोभिकरण करणे यासाठी १ कोटी ७१ लाख रूपायाचा निधी नुकताच नगरपरिषदेला दिला आहे. व याकामाच्या निविदाही प्रसिध्द झालेल्या आहेत. 

तरी या सर्व बाबींचा विचार करून शासनाने श्रीविठ्ठल रूक्णिमी मंदिर समितीस गोशाळेसाठी ३ हे १२ आर जमीन देवू नये अन्यथा पंढरपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक संघटना तसेच पंढरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते सुजित कुमार सर्वगोड नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर, अमोल डोके,धर्मराज घोडके,सौरभ थिटे,माजी नगरसेवक ॲड गुरुदास अभ्यंकर, इब्राहिम बोहरी, सामाजिक कार्यकर्त शरद माने, मालोजी शेंबडे,गणेश शिंदे नाईक, प्रमोद कदम हे उपस्थित होते उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी स्थापन केलेल्या यमाई तलाव बचाव समितीच्या वतीने जन आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments