पंढरपूर ((प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील श्री जानुबाई देवी यात्रेस उधान आले आहे. रणरणत्या उन्हात भाविकांच्या घशाला कोरड पडत आहे.या भाविकांची तहान भागवण्याचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी पार पाडला आहे. या पाणपोयीचे उद्घाटन उद्घाटन
ज्येष्ठ विधीज्ञ तसेच समाजसेवक
विश्वनाथ बापू कोरके यांच्या शुभहस्ते गुरुवारी सकाळच्या सुमारास पार पडले. यावेळी काँग्रेस नेते हनुमंत मोरे, प्रा. महादेव तळेकर, राजकुमार टरले, आप्पासाहेब थिटे आदी मान्यवर
उपस्थित होते.
तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न, शिक्षणापासून वंचितांना शिक्षण ही संत गाडगेबाबांची शिकवण होती. या शिकवणीचे आचरण काँग्रेस नेते हनुमंत मोरे यांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात श्री जानुबाई देवीची यात्रा तसेच गायकवाड साहेबांचा उरूस दरवर्षी मोठ्या उत्साहात भरतो. दरवर्षी मे महिन्यात भरणाऱ्या या यात्रेवेळी पारा चांगलाच वाढलेला असतो. यावेळी यात्रेस येणाऱ्या हजारो भाविकांना खरी गरज असते ती , पिण्याच्या पाण्याची. ही गरज हनुमंत मोरे यांनी अनेक वर्षापासून ओळखली आहे. दरवर्षीच या यात्रेत भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. या पाण्याचा आस्वाद भाविक आनंदाने घेतात. मुळातच समाजसेवेची आवड असल्याने, हनुमंत मोरे हे हा उपक्रम दरवर्षीच राबवतात. यावर्षीही येथील चांदणी चौक येथे खा. प्रणिती शिंदे यांचे बॅनर लावून , हा उपक्रम त्यांनी समर्थपणे राबवला आहे. गुरुवारी सकाळी या पाणपोयीचे उद्घाटन थाटात करण्यात आले.
याप्रसंगी दिलीप कोरके, नवनाथ कोरके, नवनाथ मेहेर, पिंटू अडगळे, शेखर मोरे, अशोक अवताडे, तानाजी कोळी, हनुमंत नाईकनवरे, नागनाथ सरडे, नवनाथ कोरके यांच्यासह इतर काँग्रेस प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments