LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलिसांनी आंबे राजनी रोडवर अवैध वाळूच्या 2 हायवा टिप्पर आणि 2 टेम्पो एकूण 4 वाहनावर कारवाई करून एकूण 55 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई



पंढरपूर तालुका पोलिसांनी  आंबे ते रांजणी जाणारे रोडवर अवैध रित्या वाळू वाहतूक केली जात आहे अशी माहिती मिळाल्याने पंढरपूर उपविभागाचे माननीय सहायक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वरती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजे आंबे रांजणी वजाणारे रोडवर आणि गोपाळपूर येथे रेड करून त्या ठिकाणी 2 हायवा टिप्पर आणि 2 टेम्पो असे एकूण 4 वाहने त्यामध्ये 11 ब्रास अवैधरित्या चोरलेली वाळू असा एकूण 55 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे एकूण दोन हायवा टिप्पर व 2 टेम्पो असे 11ब्रास वाळू सहन एकूण किंमत 55 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे दोन हायवा टिपर व 2 टेम्पो असे चारही गाड्यांचे  चालक आणि मालक  1/ पप्पू शिंदे 2/रामा पुजारी 3/दत्ता भोसले यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता बी एन एस कायदा कलम 303 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेलाआहे 

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक रणदिवे सहाय्यक फौजदार जनार्दन करे पोलीस हवालदार दीपक भोसले मंगेश रोकडे पोलीस हवालदार साळुंखे विजय कुमार आवटी संजय गुटाळ चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आसन नदाफ महेशगोडसे रामभाऊ चाटे यांच्या पथकाने केली आहे

Post a Comment

0 Comments