पंढरपूर :दि. ०२ रोजी निर्भया पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पंढरपूर ग्रामीण हद्दीत एक बालविवाह आज रोजी १० वाजता होणार होता.
मात्र पोलिसांनी नवरदेवाचे मोबाईल लोकेशन वरुन सदर ठिकाणचा तात्काळ शोध लावून बालविवाह रोखला आहे.
निर्भया पथकाने चौकशी केली असता मुलीचे नातेवाईकांनी आधारकार्ड दाखवताच मुलीचे वय हे १७ वर्षे ५ महिने असल्याचे निष्पन्न झाले, मात्र पोलीस पथकाने जास्तीची चौकशी करत तीचा शाळा सोडल्याचा दाखला मिळवला. त्यावर देखील तिचे वय हे १७ वर्षे ०५ महीने दिसुन आले. त्यानंतर मंडपातील मंडळींना व वडीलांना योग्य ती समज देवुन सदर बालविवाह रोखण्यात आलेला आहे.
त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले.
तसेच निर्भया पथक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, अशा घटना या वारंवार होत असुन अल्पवयीन मुलींचे जीवन हे खुलण्याआधीच तिच्यावर जबाबदारींचे ओझे वाहणे बंद करावे व आपले हद्दीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास निर्भया पथकास संपर्क करावा. असे आवाहन केले आहे
सदरची कारवाई मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. विजय कबाडे, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से) पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख म. पोलीस उपनिरीक्षक / सुप्रिया यादव/रावण, म.पोकॉ/१३११ निर्मला वाघमारे, म. पोकॉ/२०४८ शाहिन, पोकॉ/१२३६ शशिकांत सावंत, पोकॉ/१३९५ लक्ष्मण कुचेकर, चापोकॉ/७२ पांडुरंग टिंगरे, काझी यांनी पार पाडलेली आहे.

0 Comments