LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन कृषी वीज कनेक्शन तातडीने द्या : खासदार प्रणिती शिंदे*👉 *कासेगाव येथे खासदार प्रणिती शिंदे यांचा ग्रामसंवाद; महावितरणच्या कारभारावर संताप, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कारवाईच्या सूचना*



पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेती व वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर मांडल्या. विशेषतः महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कृषीपंपांच्या वीज कनेक्शनवर होत असलेल्या कारवाईमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिकांना पाणी देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत कृषीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे अन्यायकारक असून ही सक्तीची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी. तसेच कोणतेही अटी न लादता अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन कृषी वीज कनेक्शन तातडीने देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय प्रलंबित डीपी (विद्युत रोहित्र) संदर्भातील कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नवीन डीपी मंजूर करून वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल व महावितरण प्रशासनाला जनहिताच्या दृष्टीने जबाबदारीने काम करावे लागेल, अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, माजी सरपंच दाजी देशमुख, चंद्रभागा शुगर चे मा.संचालक भारत भुसे, सचिन देशमुख, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, महेश अधटराव, अमोल जाधव, ऋषिकेश देशमुख, नवनाथ पडुळकर, अप्पासो शिनगारे, अंकुश गवळी, औदुंबर जाधव, सौदागर जाधव, बंडू भोसले, दत्ता जाधव, कैलास जाधव, महादेव जाधव, दत्तात्रय खर्चे, तुकाराम गवळी, गुलचंद जाधव, नारायण शिंदे गुरुजी, सिताराम कलबुर्मे, लाला गुरव, गोविंदा गवळी, मामा जाधव, दत्ता जाधव, अंधू ज्ञानेश्वर जाधव, नितीन मोरे, मच्छिंद्र शिंदे, मायाप्पा जाधव यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments