दिनांक 10 जून 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील पोलिसांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पात्रगस्त करता असलेले पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व रात्रग्रस्त करता असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे यांना माहिती दिली त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी सदरची माहिती माननीय साहेब पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रशांत डगळे साहेब यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे अनवली फाटा येथे सोळा वर्षे वयाची दोन अल्पवयीन मुले घरात किरकोळ कारणावरून भांडण करून उरळीकांचन येथून सोलापूरच्या दिशेने बेंगलोरला निघून जात आहेत तरी सदर दोन्ही अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन ताब्यामध्ये घ्यावे अशी माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी पहाटे तीन वाजता शोध मोहीम राबवली अनवली फाटा या ठिकाणी जाणाऱ्या ट्रक चालकांकडे विचारपूस केली असता पुणे बेंगलोर जाणाऱ्या ट्रक जवळ दोन अल्पवयीन मुले पंढरपूर तालुका पोलिसांनामिळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांची नाव पत्ते खात्री करून उरळीकांचन पोलिसांना संपर्क केला त्या मुलाकडे विचारपूस केली असता सदर दोन्ही मुलांनी सांगितले की किरकोळ कारणावरून घरामध्ये वडिलांनी रागावल्यामुळे ती दोन्ही मुलं पुण्यातून घर सोडून बेंगलोर कडे जात होते रस्त्यामध्ये ट्रक चालक हे वाहनांमध्ये अनोली फाटा येथे चाकातील हवा चेक करण्यासाठी थांबला असता तिथे ते मुलं ट्रक मधून उतरून दुसऱ्या गाडीची वाट बघत थांबले होते अशी माहिती मिळाली त्या मुलांना पंढरपूर तालुका पोलिसांनी कौन्सिलिंग करून समजावून सांगितले व त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन त्यांची जेवणाची सोय केली त्याच्या नातेवाईकाला संपर्क केला नातेवाईक आणि उरुळी कांचन ची पोलीस बोलावून घेऊन पहाटे पोलिसांच्या ताब्यामध्ये दोन्ही मुलांना सुखरूप पणे दिलेले आहे अशा पद्धतीने घरातील लहान मुले किरकोळ रागावल्याचा कारणावरून एवढे मोठे पाऊल घेऊन पाऊल उचलून अनोळखी माणसाबरोबर लिफ्ट घेऊन ट्रकमध्ये बेंगलोर कडे चालले होते ही अत्यंत मनाला हेलकावणारी गोष्ट आहे
परंतु परत पंढरपूर तालुका पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवून दोन्ही मुलांचे मन परिवर्तन करून त्यांना त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहेत नातेवाईकांनी मुलांना ताब्यात घेऊन पुण्याकडे उरुळी कांचन चे पोलीस असं रवाना झालेले आहेत
पुणे मुलांना पालकांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये शोध घेतला परंतु मिळून आले नाही पहाटे पंढरपूर तालुका पोलिसांनी शोध मोहीम राबवून मुले ताब्यामध्ये सुखरूपाने घेऊन मुलांना व्यवस्थितपणे कौन्सिलिंगकेले व नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर नातेवाईकांनी मुलांना पाहून पंढरपूर तालुका पोलिसांचे आभार मानलेले आहे सदरची कारवाई माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय विक्रम वडणे सहाय्यक फौजदार सुधाकर हेंबाडे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार मंगेश रोकडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल रामभाऊ चाटे यांनी कारवाई केलेली आहे

0 Comments