LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबद्दल प्रभावी पथनाट्य



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस विभाग तसेच निर्भया पथक, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘मोबाईल व सोशल मीडियाचा योग्य वापर’ या विषयावर जनजागृतीपर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. सध्याचे युवक मोबाईलच्या वापराचा अतिरेक करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अभ्यास करण्याच्या वयात विद्यार्थी व तरुण मोबाईलचा अतिवापर करत असल्याचे दिसून येते. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून समाज प्रबोधन करणे गरजेचे असते. त्यासाठी स्वेरीने एक उत्तम पथनाट्याची रचना करून मनोरंजनातून जनजागृती केल्याचे दिसून येते. 
          स्वेरी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘मोबाईल फोन व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक समस्या, त्यांचे होणारे दुष्परिणाम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश पथनाट्याद्वारे प्रभावी पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविला. या कार्यक्रमात पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या निर्भया पथकाच्या प्रमुख   पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया रावण यांनी स्वयंसेवकांसमवेत सहभाग नोंदवत या सामाजिक कार्यक्रमास विशेष सहकार्य केले. यावेळी पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी उपस्थित नागरिक व युवकांना मार्गदर्शन केले. सध्याचे मोबाईलचे वाढते व्यसन, सोशल मिडियाचा गैरवापर, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण तसेच त्यांचे वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे उत्तम अभिनय करत वास्तवता मांडली व यातून होणारे दुष्परिणाम दाखवत यापासून कसे दूर राहू शकतो, हेच सुचविलेले आहे. आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्याचे कौतुक करत स्वयंसेवकांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यासाठी संपूर्ण रासेयो मधील स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments